नगरच्या प्रेमीयुगुलाला कोल्हापूरमध्ये रूम दिली खरी मात्र पुढे घडले ‘ असे की ‘ ?

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना नगर जिल्ह्यात उघडकीस आली असून नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील एका प्रेमीयुगुलाने कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरात एका यात्रीनिवासमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, राहुल विश्वासराव मच्छे ( वय 25 ) व प्रियंका विकास भराडे ( वय 20 ) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. राहुल मच्छे व प्रियंका भराडे हे तामस वाडी तालुका नेवासा येथील एकाच गावचे रहिवासी आहेत. प्रियंकाचा काही वर्षांपूर्वी गावातील एकाशी विवाहदेखील झाला होता मात्र गेले काही वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.

31 डिसेंबर 2021 रोजी दोघे दुपारी एसटी बसने कोल्हापूर येथे आले आणि अंबाबाई मंदिर परिसरातील ताराबाई रोडवरील एका यात्रीनिवास मध्ये पती पत्नी या नात्याने रूम नंबर 6 मध्ये उतरले. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी रूमचा दरवाजा बंद केला आणि रात्री अकरा वाजता दरवाजा उघडला जात नसल्याचे पाहून मालकांना शंका आल्यावर त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.

राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक संदीप जाधव व उपनिरीक्षक प्रीतम पुजारी यांनी संबंधित यात्रानिवासला भेट दिली आणि रूमचा दरवाजा तोडून काढला असता दोघांनी एकाच हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी रूमची झडती घेतल्यानंतर त्यांची एक कपड्याची बॅग मिळाली त्यात राहुलचे कपडे आणि आधार कार्ड सापडले तसेच याठिकाणी प्रियंकाने लिहिलेल्या एका चिठ्ठी तिने गावातील एकाचा मोबाईल नंबर लिहून ठेवला होता. त्यांना फोन करून दोघांच्याही नातेवाइकांना घटनेची माहिती देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे दोघांनी जीवन संपण्यापूर्वी एकमेकांना मिठी मारण्याची खोलीतील दृष्यात दिसत होते.

प्रियंकाने सुसाईड नोटमध्ये काय म्हटले आहे ?

तात्या, मामा, मामी, आत्या, मम्मी, माझे सगळे भाऊ तसेच राहुलचे दादा, मम्मी, गौतम, दाजी, बहीण यांनी आम्हाला माफ करावे. आम्ही प्रेम करतो पण आमचे प्रेम कोणाला कळले नाही. आम्ही दोघे एकत्र जगू शकत नसलो तरी मरू मात्र शकतो. त्यामुळे आम्हाला २०२२ साल पाहायचे नाही. आम्हाला माफ करा. दोघांचाही अंत्यविधी एकत्रित करा.


शेअर करा