गोविंद मोकाटे प्रकरणात मोठी घडामोड, पीडिता म्हणतेय की .. ?

शेअर करा

नगर तालुक्यात गाजलेल्या प्रकरणातील पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर या गुन्ह्याचा तपास आता नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

नगर शहराच्या एका उपनगरात राहणाऱ्या महिलेने गेल्या काही दिवसांपूर्वी मोकाटे यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराची फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर सदर महिलेने पडताळणी केलेले जात प्रमाणपत्र सादर केल्याने या गुन्ह्यात ॲट्रॉसिटीच्या कलमाचा देखील समावेश करण्यात आला.

ॲट्रॉसिटी कलम लावल्यानंतर सदरचा गुन्हा शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे वर्ग झाला होता, त्यांच्याकडून आता हा तपास नगर ग्रामीण पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होताच गोविंद मोकाटे फरार असून अद्यापपर्यंत त्यास अटक करण्यात आलेली नाही.

पीडित महिलेने पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले असून त्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ नगर तालुक्यातील जेऊर येथील राजकीय पुढारी असलेल्या गोविंद मोकाटे याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे वाढीव कलम देखील लावण्यात आले मात्र अनेक दिवस होऊन देखील आरोपी मोकाटे अद्याप फरार आहे त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही.आरोपी मोकाटे इमामपूर तालुका नगर गावामध्ये खुलेआम फिरत आहे. राजकीय ताकद त्याच्यामागे असल्याने पोलिसांवर राजकीय दबाव टाकला जात असल्याने त्याला अटक होत नाही, ‘ असेही निवेदनात म्हटले आहे.


शेअर करा