नगर ब्रेकिंग..अखेर ‘ तो ‘ पोलीस कर्मचारी संदीप मिटके यांच्या पथकाने केला जेरबंद

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे उघडकीस आली होती. लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीवर वारंवार अत्याचार करणारा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी तुळशीराम वायकर याला पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने कारवाई करत जेरबंद केले आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी वायकर याने लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद सदर महिलेने दिली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर व आरोपी वायकरविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी वेगाने सूत्रे हलवली आणि वायकर याचा ठावठिकाणा हाती आला. त्यानंतर मिटके यांच्या पथकाने कारवाई करत आरोपी तुळशीराम वायकर यास जेरबंद केले न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली असून सदर प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे समजते.