नगर ब्रेकिंग..’ त्या ‘ दोघांच्या शोधात भिंगार पोलीस वसईला पोहचले अन..

नगर शहरात येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला भिंगार पोलिसांनी सोमवारी अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सय्यद सलीम अली कलीम अली ( वय 19 राहणार भवानी नगर औरंगाबाद ) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. नगर शहरातील एका अल्पवयीन मुलीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते आणि वेळोवेळी तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याने पलायन केले होते. मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.

पोलीस तपास सुरू असताना हे दोघेही वसई-विरार परिसरात राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ कारवाईला विलंब न करता आरोपी युवकाला वसई-विरार येथून ताब्यात घेतले आणि भिंगार पोलीस ठाण्यात हजर केले. मुलीने दिलेल्या जबाबावरून त्याने तिच्यावर अत्याचार केल्याची बाब उघड झाल्याने आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.