एका सामाजिक कार्यकर्तीने दुसरीचा गोड बोलून केला ‘ करेक्ट कार्यक्रम ‘ , आता प्रकरण पोलिसात

शेअर करा

सामाजिक कार्यकर्ती म्हटल्यावर अनेक नागरिक अशा व्यक्तींवर सहज विश्वास टाकतात मात्र त्यातून देखील फसवणूक झाल्याची घटना नागपूर येथे उघडकीला आली असून स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या एका महिलेने आपल्या मैत्रिणीला तब्बल 21 लाखांचा चटका दिला आहे. हे पोलिसांकडे प्रकरण पोचल्यानंतर त्याचा बोभाटा झाला असून हर्षा नितीन जोशी ( वय 44 राहणार शांतीनगर ) असे आरोपी महिलेचे नाव असल्याचे समजते.

हर्षा जोशी ही स्वतःला समाजसेविका म्हणून घेते. काही वर्षांपूर्वी हर्षा यांनी आपल्या घरावर बँकेकडून कर्ज घेतले होते मात्र हे कर्ज त्या फेडू शकल्या नाहीत म्हणून बँकेने त्यांचे घर दोन वर्षांपूर्वी ताब्यात घेतले. हर्षा यांनी त्यांची मैत्रीण असलेली राजश्री रंजीत सेन ( वय 50 ) यांच्याकडे मदतीची याचना केली आणि आणि त्यांनी हर्षा यांना 21 लाखांची मदत केली.

हर्षा यांनी या रकमेचा बँकेत भरणा केला आणि घराचा ताबा सोडला मात्र ही रक्कम लवकर परत दिली नाही तर त्याबदल्यात हर्षा यांनी राजश्री यांना दुसऱ्या घराची रजिस्ट्री करून देण्याचे त्यांच्यात ठरले होते. त्यानुसार राजश्री यांनी वारंवार हर्षा यांना पैसे मागितले असता त्यांनी पैसेही दिले नाहीत आणि दुसऱ्या घराची रजिस्टर देखील करून दिली नाही.

सातत्याने हर्षा या टाळाटाळ करत असल्याने राजश्री यांच्या मनात फसवणूकीची भावना निर्माण झाली आणि त्यांनी हर्षा जोशी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होईपर्यंत हर्षा आणि आणि राजश्री या दोघीही सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनच काम करत होत्या मात्र पैशामुळे दोघींमध्ये ही वितुष्ट आल्याचे दिसून येत आहे.


शेअर करा