‘ मॅरेज ॲनिव्हरसरी अर्थात पश्चाताप दिन ‘ प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट

शेअर करा

पोलीस खात्यात रजेचा अर्ज ‘ वेगळ्याच ‘ भाषेत रंगवणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला सदर प्रकरण चांगलेच भोवले असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे परिसरात 29 मार्च रोजी माझा ‘ मॅरेज ॲनिवरसरी अर्थात पश्चाताप दिन ‘ आहे. कुटुंबासह हा दिवस साजरा करायचा असल्याने एक दिवसाची किरकोळ रजा मंजूर करावी असा मजकूर असलेला अर्ज सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा ग्रामीण पोलीस प्रशासनाने दिले आहेत.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांने 29 मार्च २०२२ रोजी मॅरेज ॲनिवरसरी असल्याचा अर्ज ठाणेदार यांच्या नावाने 28 मार्च रोजी सादर केला होता त्यामध्ये 27 मार्च या साप्ताहिक सुटीऐवजी 29 मार्च रोजी बदली रजा मिळावी. मॅरेज ॲनिवरसरी असल्याने ही रजा मंजूर करण्यात यावी असा हा अर्ज होता मात्र त्यात मॅरेज एनिवर्सरी म्हणजेच पश्चाताप दिन असे म्हटल्याने या अर्जाची जोरदार चर्चा झाली आणि पोलीस प्रशासन देखील खडबडून जागे झाले.

संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांने मात्र आता यावर वेगळीच भूमिका घेत संबंधित अर्ज आपला नाही तसेच त्यादिवशी रजा घेतली नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. आपल्या एखाद्या मित्राने थट्टा करण्यासाठी हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल केला असे देखील त्यांचे म्हणणे आहे मात्र जिल्हा पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहे तर पोलीस निरीक्षक सूरज तेलगोटे यांनीदेखील संबंधित पोलिस कर्मचारी या दिवशी रजेवर नव्हता तसेच असा अर्ज आमच्याकडे दिला नाही असे म्हटलेले आहे.


शेअर करा