‘ त्या ‘ शीर नसलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे रहस्य अखेर उलगडले

शेअर करा

गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. धक्कादायक बाब म्हणजे तिचे शिर कापलेले होते त्यानंतर या तरुणीची ओळख पटवण्यात पोलिसांना मोठी मेहनत करावी लागली. तब्बल दोनशे पोलीस या तरुणीची ओळख पटावी म्हणून तपास करत होते अखेरीस तपासाला यश आले आणि या प्रकरणातील मुख्य आरोपीला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.

मयत तरुणीच्या विधिसंघर्ष रूममेट असलेल्या एका तरुणीने त्यांच्यातील वादातून आपल्या मित्राच्या सहाय्याने या तरुणीची हत्या केल्याचे समोर आले आहे आतापर्यंत त्या तरुणीचे शिर आणि हत्येसाठी वापरलेली हत्यारे मात्र सापडलेली नाही. त्या विधी संघर्ष बालिकेच्या मित्राचा शोध पोलिस घेत असून लवकरच त्याला पकडण्यात येईल असे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले आहे.

मयत तरुणी आणि तिची रूममेट या दोघी चंद्रपूर व नागपूर येथे एकत्र राहत होत्या मात्र काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद होऊ लागले. मयत तरुणी ही सातत्याने आरोपी तरूणीचा अपमान करत होती त्यातून अपमानित झालेल्या तरुणीने आपल्या मित्राला हाती घेतले आणि तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

आरोपी तरुणीने आपल्या मित्राला सोबत घेत 3 एप्रिल रोजी मयत तरुणीला नागपूर इथून चंद्रपूरला बोलवले आणि त्यानंतर मित्राच्या मदतीने भद्रावती परिसरात निर्जन स्थळी नेले. तिथे गेल्यानंतर तिला मारहाण करून खाली पाडले आणि तिचे पाय पकडुन मांडीवर चाकूने वार केले. त्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून त्यांनी तिचा गळा देखील कापला आणि तिचे कपडे आणि शीर घेऊन ते पसार झाले.

मयत तरुणीचे शीर आणि हत्येसाठी वापरलेले शस्त्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही त्यामुळे या हत्येत नक्की आरोपी किती आहेत किंवा हत्येमागे दुसरे काही कारण आहे का ? मयत तरुणीचे आरोपी मुलीसोबत वाद असतानादेखील ही कुणाच्या बोलण्यावरून चंद्रपूरला आली आणि हत्येसाठी भद्रावतीची निवड करण्यात आली ? याचा देखील पोलीस तपास घेत करत आहेत.


शेअर करा