‘ मेरे प्यारे देशवासियो ‘ , सीएनजीमध्ये झाली ‘ तब्बल ‘ इतकी वाढ

शेअर करा

देशात सध्या महागाई थैमान घालत असून पेट्रोल एकशे वीस रुपयांच्या पुढे गेले आहे तर डिझेल शंभरच्या जवळपास आहे आणि गॅसच्या किमती आधीच्या सरकारच्या तुलनेत दुपटीच्याही पुढे गेलेल्या आहेत. आत्तापर्यंत सीएनजी हा नागरिकांना त्यातल्या त्यात प्रवास वाहनासाठी सोपा आधार वाटत होता होता मात्र त्याच्या देखील किमतीत आता तब्बल पाच रुपयांनी वाढ झालेली असून आंतरराष्ट्रीय बाजारात सीएनजी मिश्रणासाठी लागणाऱ्या एका वायूच्या दरात दुप्पट वाढ झाल्याचे कारण करत एक आठवड्यापूर्वी हाच सीएनजी सहा रुपयांनी महाग झाला होता त्यानंतर आता पुन्हा 13 तारखेनंतर पाच रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे .

ऑनलाईन अर्थात पाईपलाईन पद्धतीने येणारा सीएनजी काही प्रमाणात पुण्यासारख्या शहरात स्वस्त मिळतो मात्र आता पुणे शहरातही सीएनजीचा दर तब्बल 71 रुपयापर्यंत पोहोचलेला पाहायला मिळत आहे. वाहनचालकांमध्ये या निर्णयाच्या विरोधात मोठी नाराजी दिसून येत असून गाड्या घरी ठेवलेल्या बऱ्या पण व्यवसाय नको, अशी भूमिका देखील बऱ्याच व्यावसायिकांनी घेतलेली आहे तर दुसरीकडे पोटाची चिंता आहेच. वाढत्या महागाईविरोधात राजकीय पक्षांनी आंदोलन केले तर गोदी मीडिया त्यांच्या बातम्या देखील दाखवत नाही तर महागाईवर चर्चा वगैरे दूरच राहिले.

राज्य सरकारने 1 एप्रिल पासून साडेतेरा टक्के असलेला व्हॅट हा जवळपास दहा टक्के कमी केला होता त्यामुळे सीएनजीचे दर कमी झाले होते मात्र 13 तारखेला तारखेनंतर पुन्हा एकदा सीएनजीचे दर वाढले असून पुणे शहरातच हे दर 73 रुपये प्रति किलोपर्यंत गेले आहेत तर जिथे ऑनलाईन पाईपलाईन सुविधा नाही अशा ठिकाणी हे दर आणखीनच भडकलेले असल्याचे दिसून येत आहे.


शेअर करा