केंद्र सरकारच्या नवीन निर्णयानंतर सर्वसामान्यांच्या वापरातील वस्तूंवर जीएसटी आकारण्याचा प्रस्ताव हा महागाई वाढवणारा असल्याचा आरोप करून काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
सध्या पाच टक्के जीएसटी श्रेणीत असलेल्या 143 पैकी 92 टक्के वस्तू 28 टक्क्यांच्या श्रेणीत आणण्याचा प्रस्ताव जीएसटी परिषदेसमोर आहे. काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी जीएसटी वाढवण्याच्या प्रस्तावात चक्क गुळ, पापड, चष्मा, पादत्राणे या गोष्टींसह 32 इंचापेक्षा कमी टीव्ही यांचादेखील समावेश असल्याचे सांगत हा प्रस्ताव महागाई वाढवणारा ठरणार आहे असे म्हटलेले आहे .
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 143 वस्तूंपैकी 92 टक्के वस्तू 18 टक्क्यांवरून थेट 28 टक्क्यांच्या करारात नेण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महागाई होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आधीच पेट्रोल-डिझेलच्या किमतीने हैराण झालेल्या नागरिकांना आता केंद्र सरकारच्या या नवीन जीएसटी वाढीमुळे आणखीनच खिशाला झळ सोसावी लागणार आहे.