अडीच वर्षाची मुलगी गळ्यात फासाचा दोर घेऊन अन रडत रडत बाहेर आली , आत पाहिले तर..

शेअर करा

माहेरी आलेल्या गर्भवती महिलेने आणि तिच्या आईने कौटुंबिक वादाच्या कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पळशी येथे उघडकीला आलेली आहे. सुदैवाने यावेळी दोरी तूटल्याने अडीच वर्षांची चिमुकली बचावली असून सुनीता भारत साबळे ( वय 47 राहणार पळशी ) आणि त्यांची मुलगी जागृती अनिल दांगोडे ( वय सत्तावीस राहणार चिकलठाणा औरंगाबाद ) आत्महत्या केलेल्या महिलांची नावे आहेत. विशेष म्हणजे जागृती लहान असताना तिच्याही वडिलांनी आत्महत्या केली होती.

विवाहित महिला जागृती दांगोडे ही आपल्या माहेरी पळशी येथे आलेली होती त्यावेळी गुरुवारी रात्री जेवण करून आई सुनीता आणि मुलगी तिच्या लहान मुलीसोबत झोपी गेल्या. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास मुलगी घरातून रडत आली त्यावेळी शेजारील महिलेने घरात जाऊन पाहिले तेव्हा गळफास घेतल्याचे दिसून आले.

मुलगी बाहेर आली त्यावेळी तिच्या देखील गळ्यात फाशीचा दोर होता ही घटना उघडकीला येताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मायलेकीनी आत्महत्या करण्यापूर्वी मुलीच्या गळ्यात फासाचा दोर लावलेला होता मात्र सुदैवाने तो दोर तुटला आणि तिचा जीव वाचविण्यात यश आले. घटनास्थळावर एक सुसाईड नोटदेखील आढळून आलेली असून कौटुंबिक कलहातून हा प्रकार घडलेला आहे.


शेअर करा