महिला म्हणतेय की , ‘..म्हणून मला पती अन दीर यात फरक कळलाच नाही ‘

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना लातूर इथे उघडकीस आली असून जुळे असल्याचा फायदा घेऊन आपल्या दिराने आपल्यावर वेळोवेळी अत्याचार केला असे एका महिलेचे म्हणणे आहे.पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, एकदम सेम तू सेम दोघे दिसत असल्याने तिला आपला पती आणि दीर यांच्या फरक लक्षात आला नाही आणि त्यातून हा प्रकार घडलेला आहे. अत्यंत सारखे दिसणारे दोन भाऊ असल्याने आपला गैरसमज झाला आणि त्यातून हा प्रकार झाला असे तिचे म्हणणे आहे. महिलेच्या लग्नाला अवघे सहा महिने झालेले असून त्यांच्यातील फरक इतक्या कमी वेळात आपल्या लक्षात आला नाही याचा दिराने फायदा घेतला असे तिचे म्हणणे आहे .

लातूर शहरातील रिंग रोड परिसरातील ही घटना असून लातूर इथे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी महिलेचा पती दीर आणि सासू-सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर माहेरी आलेल्या नवविवाहितेने पुन्हा सासरी जाण्यास नकार दिलेला आहे.

लातूर शहरातील रिंग रोड परिसरात पीडित महिला राहते. लग्न झाले त्यावेळी महिलेला त्याला जुळा भाऊ असल्याची कल्पना नव्हती. विशेष म्हणजे दोन्ही भावांमध्ये दिसण्यात कमालीचे साम्य आहे तसेच आवाज देखील एकदम सेम टू सेम असल्याने महिलेचा गोंधळ उडाला. नुकतीच घरात आलेल्या 20 वर्षीय महिलेला आपला पती कोण आणि दीर कोण यात फरक कळला नाही आणि याचा फायदा घेत दिराने तिच्यासोबत घृणास्पद प्रकार केलाअसे महिलेचे म्हणणे आहे.

तब्बल सहा महिने हा प्रकार सुरू होता आणि त्यानंतर अखेर महिला माहेरी निघून गेली. विवाहिता माहेरी गेल्यानंतर तिला आणण्यासाठी तिचा जुळा दीर गेला होता. ती सासरी जात नसल्याने घरच्यांनी तिला कारण विचारले तेव्हा तिने कारण सांगितलेले ऐकून आई वडिलांच्या पायाखालील वाळू सरकली. त्यांनी तिला आधार दिला आणि झालेल्या प्रकाराबद्दल शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही भावांना बेड्या ठोकल्या असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.


शेअर करा