एक्स गर्लफ्रेंडच्या नातेवाईकांचा प्रियकराने बनवला व्हाट्सएप्प ग्रुप मात्र मनात होते ‘ असे काही ‘ की ?

शेअर करा

पूर्वाश्रमीच्या प्रियकरानेच विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून आरोपी आणि पीडित महिला यांच्यात लग्नाआधी प्रेमसंबंध होते त्यातून त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि त्याचा एक व्हिडीओ ह्या आरोपीने बनवला होता. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने लग्नानंतर देखील तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे .

उपलब्ध माहितीनुसार, पांडुरंग हरीशचंद्र पारगावे (रा. लातुर) असे आरोपीचे नाव असून पीडित महिला भंडारा येथील रहिवासी आहे. २०१५ मध्ये तिचे पांडुरंग याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. पांडुरंगने त्याची मोबाइलने चित्रफित काढली. महिलेचे लग्न झाले आणि काही कारणाने तिचा मुलगा हा लातूर येथे राहायला लागला. पांडुरंग हा लातूरचाच असल्याने याबाबत पांडुरंगला कळले. त्याने महिलेच्या मोबाइलवर व्हिडिओ कॉल केला. मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. मी सांगेन ते ऐकलेस तर ठीक नाहितर शारीरिक संबंधाची चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, पांडुरंगने महिलेला रामटेकला बोलाविले होते. रामटेक येथील एका हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन तो महिलेला सतत ब्लॅकमेल करायला लागला.महिलेशी काही काळाने बिनसल्यानंतर पांडुरंग याने पीडित महिलेच्या नातेवाइकांचा व्हाट्सएप्प ग्रुप तयार करून त्यावर अश्लील चित्रफित पोस्ट केली.

पांडुरंग असे काही करेल याची महिलेला कल्पनाच नव्हती. नातेवाईकाच्या ग्रुपवर सदर महिलेचा व्हिडीओ दिसताच महिलेची सर्व नातेवाईकांत बेअब्रू झाली. त्यानंतर तिने पतीसह रामटेक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. रामटेक पोलिसांनी पांडुरंग हरीशचंद्र पारगावे (रा. लातुर) याच्याविरुद्ध अत्याचार व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पांडुरंग याचा शोध सुरू केला आहे.


शेअर करा