ब्रेकिंग ..अमित शाह यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने एम्समध्ये केले दाखल

शेअर करा

कोरोनावर मात करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घरी परतलेले असताना रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात 14 ऑगस्ट रोजी कोरोनामुक्त झाल्याचे स्वतः ट्वीट करून सांगितले होते. शाह यांनी ट्वीट करून आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती.

सोमवारी रात्री अमित शहांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. 2 ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती तर उपचारानंतर 14 ऑगस्टला अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनावरील उपचार करण्यात आले होते

श्वसनाचा त्रास होत असल्याने अमित शाह यांना रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. याआधी अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर उपचारानंतर दुसऱ्यांदा चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून अमित शाह होम आयसोलेशनमध्ये होते.


शेअर करा