वहिवाट रस्ता काढून देण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याचे बोट ग्रामस्थाने धरले अन ..

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून नागरिक कायदा हातात घेत असल्याचे प्रकार उघडकीला येत असून अशीच एक घटना उस्मानाबाद जिल्ह्यात समोर आलेली आहे तहसीलदार यांच्या आदेशानुसार रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाला चार जणांनी संगनमत करून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली आणि त्यातील एका व्यक्तीने तर त्याहून पुढे जात मंडल अधिकारी यांच्या बोटाचा चावा घेतला. 30 तारखेला दुपारी ही घटना वरुडा येथे उघडकीला आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, वरुड येथील एका गटातील शेतीला रस्ता नसल्याने त्या शेतकऱ्याला अनंत अडचणी येत होत्या म्हणून त्यांनी तहसीलदार यांच्याकडे रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मंडळ अधिकारी असलेले अनिल तीर्थकर यांचे पथक 30 तारखेला दुपारी शेतात पोहोचले होते त्यावेळी तेथे उपस्थित असलेले ग्रामस्थ गोरोबा आणि रामेश्वर रोटे यांनी शुभम रोटे याच्यासोबत संगनमत करत पथकाला शिवीगाळ केली आणि प्रसाद रोटे याने चक्क तीर्थकर यांच्या बोटाचा चावा घेतला. चावा इतका कडकडून घेतलेला होता की रक्त वाहू लागल्यानंतर तिर्थकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आणि गुन्ह्याची नोंद करण्यात आली.


शेअर करा