नगर मनपा ‘ ऍक्टिव्ह मोड ‘ मध्ये , पंधरा दिवसाची दुकानदारांना मुदत अन्यथा ..

शेअर करा

नगर शहरातील बहुतांश दुकानांवर इंग्रजी भाषेत पाट्या असल्याने महापालिकेने आता सदर पाट्या मराठीत करून घ्या अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा दिलेला आहे. महापालिकेने 22 तारखेला या संदर्भात आदेश काढलेला असून दुकानदार आणि व्यवसायिक यांना पंधरा दिवसांची मुदत यासाठी देण्यात आलेली आहे.

राज्यातील सर्व दुकानांवर मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने लागू केला होता मात्र अनेक ठिकाणी या नियमाची पायमल्ली होत असल्याचे नगर शहरासह संपूर्ण राज्यात चित्र आहे. अनेक दुकानाच्या बाहेर लावलेल्या बोर्डवर इंग्रजी अक्षरे मोठ्या स्वरूपात आढळून येतात तर मराठीसाठी मात्र लहान फॉन्ट वापरला जातो त्यामुळे जानेवारी 2022 मध्ये राज्य सरकारने या संदर्भात सुधारित आदेश जारी केलेला आहे त्यामध्ये मराठीतील अक्षरे ही इंग्रजीपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

नगर शहरासह उपनगरात देखील अनेक दुकानांवर इंग्रजी भाषेतील फलक लावण्यात आलेले आहेत तर काही ठिकाणी मराठी एकही शब्द लिहिलेला नाही त्यामुळे पंधरा दिवसाच्या आत सुधारित पद्धतीने आपल्या दुकानाचे बोर्ड करून घ्यावेत असा आदेश महापालिकेने काढलेला असून महापालिकेचे कार्यक्षम (? ) अधिकारी आता किती जणांवर कारवाई करतात आणि त्यानंतर परिस्थिती कितपत बदलते याकडे समस्त नगरकरांचे देखील लक्ष लागून आहे.


शेअर करा