पुण्यात खळबळ..पतीच्या आत्महत्येनंतर परप्रांतीय तरुणाशी मैत्री मात्र ‘ असा ‘ झाला शेवट की..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना पुण्यातील पिंपरी येथे उघडकीला आली असून एका महिलेने किरकोळ कारणावरून राहत्या घरात गळफास घेतलेला आहे. मयत महिलेचे एका परप्रांतीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यातून ते सातत्याने भेटत असायचे. तिने त्याला जेवायला बोलावले आणि तो आला नाही त्यामुळे तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सुलोचना नामदेव लेकुरवाढ ( वय 30 ) असे मयत महिलेचे नाव असून सुलोचना यांच्या पतीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती त्यानंतर त्या लातूर येथील त्यांचे घर सोडून उदरनिर्वाहासाठी पुणे येथे आल्या होत्या. पुण्यात आल्यानंतर त्या हाउसकीपिंग आणि मेस चालवत होत्या. त्यांना चार मुली असून गावाकडे त्या शिकत आहेत .

काम करत असताना त्यांची एका परप्रांतीय तरुणाशी ओळख झाली होती आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते त्यानंतर ते एकमेकांशी फोनवर तासंतास बोलत होते आणि काही दिवसानंतर लग्न देखील करणार होते अशीही माहिती समोर आलेली आहे. नेहमीप्रमाणे ते रोज सोबत जेवण करत असायचे मात्र बुधवारी रात्री सुलोचना यांनी त्याच्यासाठी रुचकर जेवण बनवले मात्र लवकर आला नाही यातून त्यांनी निराश होऊन त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे.


शेअर करा