मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा डावललं, पंकजाताई मुंडे काय म्हणाल्या ?

शेअर करा

राज्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा एकदा भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजाताई मुंडे यांना वगळण्यात आलेले आहे त्यामुळे पंकजाताई मुंडे यांच्या समर्थकात नाराजीचे वातावरण पुन्हा एकदा दिसून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी ‘ अजून त्यांना माझी पात्रता वाटत नसेल, त्यामुळे मला मंत्रीपद दिलं नसेल ‘, अशा शब्दात आपल्या मनातील नाराजी एक प्रकारे व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे.

काय म्हणाल्या पंकजाताई मुंडे ?

ज्यावेळी मंत्रिमंडळ बनत असतं त्यावेळेस सर्वांना समाधानी करणं शक्य नसतं. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी तरी लोकांचा समाधान करावं अशा शुभेच्छा मी नव्या मंत्र्यांना देऊन झालेल्या आहेत. मी चर्चेत राहणारच नाव आहे मात्र अजून त्यांना माझी पात्रता वाटत नसेल त्यामुळे मला मंत्रीपद दिलं नसेल, जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा देतीलही कदाचित त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. अशा चर्चा मीडियातून होतात आणि कार्यकर्त्यातून होतात.

नव्या मंत्रिमंडळात महिला ह्या असल्याच पाहिजेत मात्र माझं सांगणं आहे की महिला म्हणजे महिला बालकल्याण, एखादा मुस्लिम बांधव म्हणजे अल्पसंख्यांक, आदिवासी भागातून म्हटल्यावर आदिवासी विकास, शेड्युल कास्ट म्हणजे शेड्युल कास्ट खातं असं करू नये. मला कौतुक वाटतं की मागच्या मंत्रिमंडळात मी महिला असूनही मला ग्रामविकास खातं मिळालं होतं. अशा रितीनेच महिलांना संधी दिली पाहिजे अशी अपेक्षा मी या मंत्रिमंडळाकडून व्यक्त करते.


शेअर करा