नागेश पवार मृत्यूप्रकरणी रेल्वे पोलिसांवर गुन्हा दाखल करा , वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर

शेअर करा

जामखेड येथील नागेश रामदास पवार याला पुणे रेल्वे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती त्यानंतर अटक करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीत याचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात येत असून वंचीत बहुजन आघाडीच्या एडवोकेट अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड येथे निदर्शने देखील करण्यात आली त्यामध्ये नागेश पवार मृत्यू प्रकरणी रेल्वे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

15 ऑगस्ट रोजी रेल्वे पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात नागेश पवार आणि त्याचे सासरे सुरेश काळे या दोघांना हडपसर येथून अटक केली होती. सुरेश काळे यांचा पूर्वी अपघात झाल्याने त्यांच्या पायामध्ये आणि हातामध्ये रॉड टाकलेले होते असे नागेशची बहिण पोलिसांना सांगत होती मात्र पोलिसांनी त्यांचे काहीएक ऐकून घेतले नाही असे देखील नागेश यांच्या बहिणीचे म्हणणे आहे.

23 ऑगस्ट रोजी नागेश याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याची तब्येत सिरीयस आहे असा मेसेज त्याची बहीण राणी हिला पाठवण्यात आला त्यानंतर कुटुंबीय ससून रुग्णालयात गेले असताना नागेशचा मृत्यू झाल्याचे तिला सांगण्यात आले. मयत नागेश यास तीन मुले असून कुटुंबियाच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदत देण्याची मागणी करत पुणे येथील रेल्वे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी एडवोकेट अरुण जाधव यांनी केलेली असून मोठ्या प्रमाणावर यावेळी जनसमुदाय देखील उपस्थित होता.


शेअर करा