गूढ उलगडले..’ जीजू ‘ म्हणून तिने विश्वास ठेवला अन जीव गमावला

शेअर करा

महाराष्ट्रात अत्यंत खळबळजनक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला मठ येथे उघडकीला आलेले असून सायली गावडे या 22 वर्षीय तरुणीचा अत्यंत अमानुषपणे खून करण्यात आलेला आहे. कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात सायली परिचारिका म्हणून काम करत होती. एकतर्फी प्रेमातून हा खून करण्यात आलेला असून तिच्या मैत्रिणीचा पती असलेल्या एका व्यक्तीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सायली हिचा मृतदेह एका काजूच्या बागेत आढळून आला होता त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा हा प्रकार समोर आला.

उपलब्ध माहितीनुसार, गोविंद दाजी माधव ( वय 28 राहणार परळी तालुका वेंगुर्ला ) असे या नराधम आरोपीचे नाव असून मयत सायली तिच्या चेहऱ्यावर जखमा आणि गळ्याभोवती काळा व्रण देखिल आढळून आलेला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तब्बल तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यातील एकाने खुनाची कबुली दिली आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास काजूच्या बागेत तिचा मृतदेह आढळून आला होता आणि पोलिसांनी रात्री एकच्या सुमारास तिचा मृतदेह ताब्यात घेतला.

सदर प्रकरणातील मुख्य संशयित गोविंद दाजी माधव याची पत्नी आणि सायली या दोघी मैत्रिणी होत्या त्यामुळे सायली देखील आरोपीला जीजू असे म्हणत होती. सायली सतत एसटीने तिच्या कामाच्या ठिकाणी जायची मात्र रविवारी तिला रस्त्यात गोविंद भेटला आणि त्याने तुला कामावर सोडतो असे सांगत आपल्या गाडीवर बसवले मात्र ती कामावरच पोहोचली नाही अशी माहिती पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल जाधव यांनी दिलेली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तिची हत्या केली असे पोलिसांकडून सांगण्यात आले असून इतर दोन आरोपींनी आरोपींची चौकशी सुरू असल्याचे समजते.

सायली हिचे वडील यशवंत लहू गावडे यांनी 28 तारखेला सकाळी ती बेपत्ता असल्याची खबर पोलिसांना दिली होती त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि हे धक्कादायक प्रकरण समोर आले. सायली हिने प्रेमसंबंध नाकारले म्हणून तिच्या जोडणीने तिचा गळा आवळून तिचा खून केला अशी आरोपीने कबुली दिलेली आहे. गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी देखील सुरुवातीलाच व्यक्त केलेला होता आणि तपासात हेच समोर आलेले आहे.


शेअर करा