‘ तुम्ही लई आवडता ‘ म्हणत माजी सरपंचासमोरच कपडे काढले अन त्याच वेळी..

शेअर करा

मोबाईलमध्ये कॅमेऱ्याची सुविधा आल्यानंतर त्याचा गैरवापर करत प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचे व्हिडिओ शूटिंग करून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सध्या वाढलेले आहेत अशीच एक खळबळजनक घटना बुलढाणा येथे समोर आली असून एका महिलेने माजी सरपंच यास कॉल करून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्यानंतर त्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करणे सुरु केले.

उपलब्ध माहितीनुसार, पिडीत माजी सरपंच हे त्यांच्या दैनंदिन कामकाजात असताना एका महिलेने त्यांना फोन केला आणि त्यानंतर मेसेज आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून ते संपर्कात राहायला लागले. त्यानंतर या महिलेने त्यांना फोन करून एका निर्जनस्‍थळी बोलावले आणि ‘ मला तुमच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आहेत. मला तुम्ही खूप आवडता ‘ असे सांगत अंगावरील एकेक कपडा उतरविण्यास सुरुवात केली . तितक्यात तिथे दबा धरून बसलेले पाच जण आले आणि त्यांनी या माजी सरपंचाला मारहाण केली आणि तुझे फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहेत ते आत्ता लगेच व्हायरल करू, अशी धमकी दिली आणि सरपंच यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली.

माजी सरपंच यांनी आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे म्हटल्यानंतर त्यांनी जे काय आहे ते असे म्हणत साडेपाच हजार रुपये काढून घेतले आणि तिथून पळून गेले. माजी सरपंच यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत घटनेची माहिती बुलढाणा पोलिसांना दिली असून पोलिसांनी सर्व आरोपीसह महिलेला देखील बेड्या ठोकलेल्या आहेत .


शेअर करा