देशातील वाढत्या महागाईवर केंद्राने जबाबदारी झटकली , निर्मला सितारामन म्हणाल्या..

शेअर करा

देशात महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल आणि डिझेल तसेच गॅस यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांचे जगणे अवघड झालेले आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून मात्र जबाबदारी झटकण्याचे काम नेहमीप्रमाणे केले जात असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई संदर्भात वक्तव्य करताना देशातील महागाई केवळ केंद्र सरकारकडून हाताळली जाऊ शकत नाही. राज्य सरकारांना सोबत घेऊन महागाई हाताळण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतील असे म्हटले आहे.

काय म्हणाल्या निर्मला सितारामन ?

ज्या राज्यांनी इंधनाच्या किमती कमी केल्या नाहीत त्या राज्यांमध्ये महागाईचा दर राष्ट्रीय स्तरा पेक्षा जास्त आहे. देशाच्या विविध भागांमध्ये प्रचलित असलेली महागाई राज्यानुसार बदलत असते. मी राजकारण करत नाही पण ज्या वेळी जागतिक इंधनाच्या किंमती वाढल्या होत्या त्यावेळी त्याचा भार तुमच्यावर पडणार नाही याची काळजी घ्यायची होती . हे कसं आणि कधी शक्य होईल याचा विचार करून केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनाच्या किमती दोनदा कमी केल्या. आपल्याकडे सार्वजनिक डोमेनमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली माहिती हेच दाखवते की महागाईचा दर राज्यानुसार बदलतो मात्र याची अनेक कारणे असू शकतात. वस्तुस्थिती अशी आहे की ज्या राज्यांनी योगायोगाने इंधनाच्या किमती कमी केल्या नाहीत त्या राज्यांमधील महागाई राष्ट्रीय पातळीवरील महागाई पेक्षा जास्त आहे असा देखील दावा त्यांनी केलेला आहे.


शेअर करा