‘ पैसे दिले नाही तर तुझा मूसेवाला करू ‘ , तोफखान्यात फिर्याद दाखल

नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांना एका निनावी पत्राद्वारे जीव मारण्याची धमकी देण्यात आली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते असलेले अशोक गायकवाड अनेक सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. याआधी देखील त्यांच्यासोबत असे धमकीचे प्रकार घडलेले आहेत.

अशोक गायकवाड यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली असून ‘ पैसे दिले नाही तर तुझा मूसेवाला करू ‘ असे देखील या निनावी पत्रात म्हटले आहे त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात तक्रार दिलेली आहे. अशोक गायकवाड यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर त्यांना अशी धमकी आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून वारंवार हे असे प्रकार होत असल्याने आपल्या जीविताला धोका आहे असे त्यांचे म्हणणे आहे.