रेल्वे स्टेशनजवळील महिलेच्या मृतदेहाजवळ डायरी सापडली

शेअर करा

नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात इंगळे वस्ती येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता. प्राथमिक माहितीनुसार सदर महिलाही छत्तीसगड येथील रहिवासी असल्याचा अंदाज आहे मात्र पोलीस तपास करत आहेत. कोतवाली पोलिसांचे एक पथक छत्तीसगडला रवाना झाले असून सदर महिलेचा मृत्यू हा खून की आत्महत्या याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून लवकरच या प्रकरणाचे सत्य समोर येणार आहे.

29 तारखेला एका अनोळखी महिलेचा मृतदेह इंगळे वस्ती परिसरातील आढळून आलेला होता. अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

महिलेच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक डायरी सापडली होती त्यामध्ये कोरबा छत्तीसगड असे लिहिलेले होते त्यामुळे महिला छत्तीसगडची असावी असा देखील पोलिसांचा अंदाज आहे मात्र कदाचित हा प्रकार दिशाभूल करण्यासाठी देखील केलेला असू शकतो याचा देखील पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांचे एक पथक छत्तीसगडला रवाना झाले असून महिलेची ओळख पटल्यानंतर तपासाला गती येणार आहे. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आलेला नसून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.


शेअर करा