निर्मला सीतारामन म्हणतात , ‘ मी मध्यमवर्गीय कुटुंबातून त्यामुळे.. ‘

शेअर करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या आहेत. मी ज्या कुटुंबातून येते त्या कुटुंबात कांदा खाल्ला जात नाही सोबतच कोरोना म्हणजे देवाचे कृत्य आहे अशी देखील वक्तव्य त्यांनी याआधी केलेली आहे त्यानंतर त्यांचे एक नवीन वक्तव्य पुन्हा चर्चेत आलेले असून त्यामध्ये त्यांनी ‘ मी स्वतः मध्यमवर्गीय कुटुंबातून येते आणि त्यांच्या अडचणीची जाणीव मला आहे’ असे म्हटलेले आहे. विद्यमान सरकारने मध्यमवर्गीय व्यक्तींवर कुठलाही कर लावलेला नाही असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.

संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, ‘ मध्यमवर्गीय कुटुंबावर असलेला दबाव मी समजू शकते. सरकारने त्यांच्यासाठी भरपूर काम केलेले असून यापुढे देखील सरकार मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आणखी काम करणार आहे. मध्यमवर्गीय व्यक्तींची लोकसंख्या सध्या बऱ्याच प्रमाणात वाढलेली असून त्यांचे पाच लाख रुपयांचे उत्पन्न हे करमुक्त आहे, ‘ असे देखील त्या म्हणाल्या. 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प त्या मांडणार असून या अर्थसंकल्पात सरकारची नक्की काय भूमिका राहील हे स्पष्ट होणार आहे.


शेअर करा