‘ लिव्ह इन ‘ पार्टनरचा खून करणारी महिला जामखेडमध्ये जेरबंद

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण बीड जिल्ह्यात समोर आलेले असून दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका प्रियकराची प्रेयसीने दगडाने ठेचून हत्या केलेली आहे. शुक्रवारी सकाळी पालवन चौकाजवळ धानोरा रोडवर हा प्रकार घडलेला असून प्रेयसीला नगर जिल्ह्यातील खर्डा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दत्तात्रय राधाकिसन इंगळे ( वय 44 राहणार हिवरसिंगा तालुका शिरूर जिल्हा बीड सध्या राहणार बीड ) असे मयत व्यक्तीचे नाव असून त्यांची पत्नी जयश्री यांनी याप्रकरणी पोलिसात खबर दिलेली असून त्यामध्ये आपल्या पतीचे कविता आजिनाथ इंगळे नावाच्या एका महिलेसोबत प्रेम संबंध होते . कविता हिच्या पतीचे आठ वर्षांपासून आठ वर्षांपूर्वी निधन झालेले आहे तेव्हापासून ती आणि आपला पती यात अनैतिक संबंध होते असे म्हटलेले आहे. आपले पती दत्तात्रय हे एका व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होते असे सांगत आपल्या पतीचा खून प्रेयसीनेच केलेला असल्याचा देखील म्हटलेले आहे.


शेअर करा