कोपरगावमधून गायब ‘ तो ‘ मुलगा अद्यापही सापडेना , कुटुंबीयांचे अश्रू थांबेनात

शेअर करा

नगर जिल्ह्यात कोपरगाव येथे एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून 20 जानेवारी रोजी मंदिरात जातो म्हणून निघून गेलेला मुलगा अद्यापही पुन्हा घरी परतला नाही. नागेश वाघमारे असे या मुलाचे नाव असून तो त्याच्या काकांकडे कोपरगाव इथे गेलेला होता. तिथे गेल्यानंतर वीस तारखेला तो मंदिरात जातो असे सांगून सकाळी ११ च्या दरम्यान घरातून निघून गेला तो पुन्हा आलाच नाही. घरात त्याच्यासोबत कुठलाच कौटुंबिक कलह झालेला नाही असेही कुटुंबियांकडून सांगण्यात आलेले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, नागेश ज्ञानेश्वर वाघमारे ( वय सोळा ) असे परिसरातून गायब झालेल्या या मुलाचे नाव असून त्याचे वडील नगर शहरात गुलमोहर रोड येथे सावली पोलीस चौकीजवळ कपडे दुरुस्तीचा व्यवसाय करतात. त्यांनी त्यांच्या भावाकडे कोपरगाव येथे दोन महिन्यांसाठी आपल्या मुलाला पाठवले होते त्यानंतर 20 जानेवारी रोजी सकाळी मंदिरात एका धार्मिक कार्यक्रमासाठी म्हणून तो घरातून निघून गेला त्यानंतर तो पुन्हा घरी परतलाच नाही. . आपल्या परिसरात तो कुठे आढळला तर 93228 17194 या त्याच्या वडिलांच्या फोनवर किंवा कोपरगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

मुलाच्या कुटुंबीयांनी तो गायब झाल्याची तक्रार कोपरगाव पोलीस ठाण्यात दिलेली असून घटनेला तब्बल आठ दिवस उलटून गेले तरी अद्यापही त्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. मुलाच्या कुटुंबीयांची आर्थीक परिस्थिती अत्यंत नाजूक असून लवकरात लवकर पोलिसांनी या प्रकरणाचा त्याला शोधून काढावे अशी मागणी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलेली आहे.


शेअर करा