नेवासा तालुक्यातील आठ कुटुंबे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला

शेअर करा

नेवासा तालुक्यात तब्बल आठ कुटुंबीयांचा शेतात येण्या-जाण्याचा रस्ता अडवल्याचे प्रकरण सध्या समोर आलेले असून तालुक्यातील मौजे टोका येथे प्रकार समोर आलेला आहे. तहसीलदार यांनी रस्ता खुला करून देण्याबाबत आक्रमक भूमिका घेणे गरजेचे होते मात्र त्यांच्याकडून चालढकल करत केली जात असल्याचा आरोप करत आठ कुटुंबातील रहिवासी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणाला बसलेले आहेत. धनदांगड्या व्यक्तींकडून आमचा शेतात येण्याजाण्याचा रस्ता अडवला असल्या कारणाने पिकांचे नुकसान झालेले आहे आणि तहसीलदारदेखील आमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत आहे असे म्हटलेले आहे. त्या संदर्भात त्यांनी एक निवेदन दिलेले आहे .

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, आम्ही सर्व मौजे टोका गावचे रहिवासी असून कायमचे रहिवासी असून गट नंबर आठ आणि नऊमध्ये जमीन मालक मिराबाई रूपचंद गंगुले हे जमीन मालक असून सदर गटामधून जुन्या गावठाण मध्ये गट नंबर सात / एक, 13, 14, 15 मध्ये जाणे येण्यासाठी रस्ता बनवलेला होता मात्र वरील रस्ता मीराबाई रूपचंद गंगुले यांनी काट्या टाकून बंद केलेला आहे आणि या रस्त्यावर जाणीवपूर्वक त्यांनी पाणी सोडलेले आहे.

त्यांची मुले मच्छिंद्र रूपचंद गंगुले आणि सुनील रूपचंद गंगुले यांनी या रस्त्याबाबत कोर्टातली केस मागे घेतली नाही तर आम्ही तुम्हाला असाच त्रास देणार आहोत असे या कुटुंबीयांना धमकावल्याचा देखील आरोप केलेला असून रस्ता खुला झाला नाही तर या कुटुंबीयांनी 30 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला होता त्यानंतर त्यांनी उपोषण सुरू केलेले आहे . अद्यापपर्यंत प्रशासनाच्या वतीने कोणीही आमच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही असे त्यांनी म्हटलेले आहे. नेवाश्याचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना याप्रकरणी त्यांनी निवेदन दिलेले असून आमच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी लवकरात लवकर तोडगा काढावा असे म्हटलेले आहे .


शेअर करा