फिर्याद का दिली ? , मुलीच्या बहिणीकडे कोयता घेऊन गेला अन..

शेअर करा

नगर शहरात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्याची फिर्याद का दिली ? म्हणून एका आरोपीने जेलमधून सुटल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांना कोयत्याने मारहाण केलेली आहे. शुक्रवारी 27 तारखेला ही हा प्रकार घडलेला असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संदीप उर्फ बाला राजू घोरपडे ( राहणार कोठला झोपडपट्टी ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून अल्पवयीन मुलीच्या बहिणीने त्याच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. आरोपी याने फिर्यादी व्यक्ती यांच्या बहिणीशी लग्न केलेले आहे मात्र ती अल्पवयीन असल्याची माहिती मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेली होती त्यावरून बाला घोरपडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. दहा ते बारा दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर तो बाहेर आला त्यावेळी त्याने ही फिर्याद कोणी दिली ? याची माहिती घेतली आणि फिर्यादी व्यक्ती यांना कोयता घेऊन दमदाटी केल्याचे दमदाटी आणि मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .


शेअर करा