1064 वर फोन गेला अन पोलीस नाईक जाळ्यात ,शेवगावमधील प्रकार

शेअर करा

पोलीस दलातील भ्रष्टाचार काही लपून राहिलेला नाही. पोलीस दल आणि महसूल विभाग यात सर्वाधिक लाचखोरीचे प्रमाण दिसून येत असून असाच एक प्रकार नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात उघडकीस आलेला आहे. एका अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . 31 तारखेला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलेली आहे

उपलब्ध माहितीनुसार, पोलीस नाईक एस सी काकडे असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव असून तक्रारदारी व्यक्ती यांच्या वडिलांचे अपघाती निधन झालेले होते त्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल करावा म्हणून त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात अनेकदा हेलपाटे मारले मात्र त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला जात नव्हता. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस नाईक एस सी काकडे यांनी तक्रारदार व्यक्ती यांच्याकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केलेली होती .

14 जानेवारी रोजी ही रक्कम आपल्याला द्या असे देखील त्यांनी सांगितले होते. तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 10 64 नंबर वर फोन केला आणि त्यानंतर पथक सक्रिय झाले. पथकाने पडताळणी करून याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक साधना इंगळे प्रकरणाचा तपास करत आहेत.


शेअर करा