..म्हणून ‘ अतिउत्साही ‘ पालकाला पोलिसांचा प्रसाद , व्हिडीओ व्हायरल

शेअर करा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल झालेली असून जळगाव जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहे. आपल्या पाल्याला कॉपी पुरवण्यासाठी गेलेल्या एका पालकाला पोलिसांनी जबरदस्त चोप दिलेला आहे

दहावी बारावीच्या परीक्षा सध्या सुरू असून राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. परीक्षा केंद्राच्या जवळ झेरॉक्स सेंटर बंद करण्यात येतात तसेच पोलिसांचा देखील चांगला बंदोबस्त असतो असे असताना देखील या अतिउत्साही पालकाने आपल्या मुलाला कॉपी देण्यासाठी धाव घेतली होती मात्र पोलिसांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावद येथील परीक्षा केंद्रावरील हा व्हिडिओ असून नूतन ज्ञानमंदिर विद्यालय येथे दहावीच्या परीक्षेसाठीचे केंद्र आहे या केंद्रावर परीक्षा सुरू असताना हा उत्साही पालक तिथे पोहोचलेला होता. परीक्षा केंद्रापासून शंभर मीटर अंतर प्रतिबंधित क्षेत्र असल्याने असले तरी या उत्साही पालकाला त्याची फिकीर नव्हती.

पोलिसांनी या व्यक्तीला हटकले त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि त्याच्याजवळ कॉपी आढळून येताच पोलिसांनी त्याला चांगलाच चोप दिला. पळून जाण्याच्या प्रयत्नात ते खाली पडले मात्र तरी देखील पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसून येत असून मारहाण करणारा अधिकारी हा जळगाव पोलीस दलातील असून गणेश बुवा असे त्यांचे नाव असल्याचे समजते. पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी गणेश बुवा यांच्यावर कारवाईची मागणी केली जात असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


शेअर करा