मौलानाने केलं महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य , पतीला ‘ त्या ‘ गोष्टीसाठी..

शेअर करा

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर महिलांवरील अत्याचाराला आणि काही सीमा राहिलेली नाही. तालिबांच्या आगमनानंतर कट्टरवाद मोठ्या प्रमाणात वाढलेला असून सामाजिक माध्यमांमध्ये महिलांची उपस्थिती संपल्यात जमा आहे अशी परिस्थिती असताना एका मौलवी व्यक्तीने महिलांबद्दल एक संतापजनक वक्तव्य केलेले असून सोशल मीडियावर या मौलवीचा चांगलाच समाचार घेण्यात येत आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अहमद फिरोज अहमदी असे या सुन्नी मौलवीचे नाव असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामध्ये तो काहीही झालं तरी पत्नीने पतीची लैंगिक इच्छा पूर्ण केली पाहिजे असे सांगताना तो दिसून येत आहे. महिलादेखील माणूस आहेत याचा याला विसर पडलेला दिसत आहे.

@SAMRIReports नावाच्या एका ट्विटर हँडल वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असून त्यामध्ये पत्नी तंदूर रोटी भाजत असली तरी पत्नीने पतीची लैंगिक इच्छा पूर्ण केली पाहिजे असे म्हणताना दिसून येत आहे. ट्विटरवर लोकांनी या मौलवीचा चांगलाच समाचार घेतलेला असून त्याच्या या वक्तव्याविषयी अनेक संतापजनक अशा प्रतिक्रिया नागरिकांनी त्याला दिलेल्या आहेत.

तालिबानने सध्या महिलांच्या शिक्षणावर आणि नोकरीवर देखील बंदी घातलेली असून घराबाहेर पडताना देखील घरातील पुरुष व्यक्तीसोबत असेल तरच महिलांना बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य आहे. महिलांसाठी नोकऱ्या नसल्याने आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीदेखील अनेक कुटुंबांना निर्माण झालेल्या असून माध्यमांची देखील मोठ्या प्रमाणात गळचेपी केली जात आहे.


शेअर करा