नारळ पुढं सरकवण्याचा प्रयत्न केला अन ‘ नको ते ‘ घडलं

शेअर करा

एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना पैठण परिसरात जायकवाडी धरणाजवळ समोर आलेली असून एका तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झालेला आहे. जायकवाडी धरणावर फिरण्यासाठी गेलेले असताना या तरुणाने आपल्याजवळ असलेला नारळ जलाशयात अर्पण केला मात्र हा नारळ काठावरच तरंगल्याने त्याला पुढे सरकण्याच्या सरकवण्याच्या प्रयत्नात त्याचा देखील तोल गेला आणि पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर त्याचा मृत्यू झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अभिषेक प्रकाश आंधळे ( वय 21 राहणार जय भवानी नगर छत्रपती संभाजीनगर ) असे मयत तरुणाचे नाव असून तो आणि त्याचे तीन मित्र पैठण येथे एकादशी निमित्ताने देवदर्शन आणि फिरण्यासाठी गेलेले होते त्यानंतर ते चारही जण संध्याकाळी पाचच्या सुमारास जायकवाडी धरणावर फिरायला गेले आणि अभिषेक याने त्याच्याजवळील नारळ नदीला जलाशयात अर्पण केला मात्र नारळ तरंगत असल्याने त्याने पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचा तोल गेला.

उपस्थित नागरिकांनी त्याला बाहेर काढण्यासाठी मदत केली मात्र अखेर तो बुडून गायब झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक मच्छीमारांनी देखील त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र रात्री नऊच्या दरम्यान अखेर त्याचा मृतदेह हाती आला. जलाशयाच्या अगदी जवळ जाणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध करण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत करावी अशी मागणी परिसरातील अनेक रहिवासी करत असून याआधी देखील अशाच स्वरूपाच्या घटना येथे घडलेल्या आहेत.


शेअर करा