इंदुरीकर महाराजांच्या ‘ त्या ‘ वक्तव्यावर गौतमी पाटीलचा रोखठोक जबाब

शेअर करा

महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर इंदुरीकर महाराज यांनी काही दिवसांपूर्वी टीका केलेली होती. इंदुरीकर महाराज यांनी बोलताना तिचे कुठे नाव घेतलेले नव्हते मात्र त्यांच्या बोलण्याचा रोख हा गौतमी पाटीलवरच होता. तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेते आणि आम्ही पाच हजार रुपये वाढवून मागितले तर आमच्यावर बाजार मांडण्याचा आरोप होतो. तिच्या कार्यक्रमाला राडा होतो आणि पोरांचे गुडघे फुटतात. तिला संरक्षण दिलं जातं आणि आम्हाला कुठलाही संरक्षण नसतं असे इंदुरीकर महाराज म्हणाले होते. गौतमी पाटील हिने त्यांच्या या वक्तव्यावर दिलेल्या प्रतिक्रियेची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे.

गौतमी पाटील म्हणाली की, ‘ ते महाराज आहेत मी काय बोलणार. महाराजांचा गैरसमज झालेला आहे ते जितके मानधन सांगतात तितके माझे मानधन नाही. प्रेक्षकांनी देखील हे लक्षात घ्यावे मी तीन गाण्याला तीन लाख रुपये रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले असते. आमच्या संपूर्ण टीममध्ये अकरा मुली आहेत आणि एकूण आमची वीस जणांची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे म्हणून आम्हाला मानधन घ्यावे लागते मात्र महाराज जितके सांगतात तितके मानधन आम्ही घेत नाही. तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये कुणी देणारही नाही, ‘ असे देखील ती पुढे म्हणाली

गौतमी पाटील पुढे म्हणाली की , ‘ माझ्या कार्यक्रमाला गर्दी होत असते. प्रेक्षक उपस्थित राहून एन्जॉय करतात. इतकी मोठी गर्दी होत असेल तर मी पोलिसांकडे संरक्षण मागणारच ना..महाराजच नव्हे तर कोणीही काही बोललं तरी माझे काम मात्र सुरू राहणार आहे. प्रेक्षकांनीच मला मोठे केलेले असून अडचणीच्या काळात मी त्यामुळेच जिद्दीने उभी राहिलेले आहे. मी कशी आहे हे मला माहिती आहे आणि मी किती मानधन घेते हे देखील मला ठाऊक आहे ,’ असे देखील ती पुढे म्हणाली.


शेअर करा