भाजप खासदार रवीकिशन यांच्या डीएनए चाचणीची मागणी , तरुणी म्हणतेय की.. 

शेअर करा

गोरखपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार आणि अभिनेते रवी किशन हे आपले जन्मदाता असल्याचा दावा करून त्यांची डीएनए चाचणी करण्याची मागणी करणाऱ्या २५ वर्षांच्या तरुणीने केलेला अर्ज शुक्रवारी फेटाळण्यात आला आहे . 

अपर्णा सोनी आणि रवी किशन यांच्यातील प्रेमसंबंधांतून आपला जन्म झाल्याचा दावा या शिनोव्हा शुक्ला या तरुणीने केला होता तसेच कनिष्ठ न्यायालयात धाव घेऊन किशन यांच्या डीएनए चाचणीच्या मागणीसाठी अर्ज केला होता मात्र सोनी आणि किशन यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सूचित करणारे कोणतेही सकृतदर्शनी पुरावे आढळून आलेले नाही, असे नमूद करून कनिष्ठ न्यायालयाने या तरुणीचा अर्ज फेटाळला.

आपण किशन यांना चाचू म्हणून संबोधत असले तरी प्रत्यक्षात ते आपले जन्मदाता आहेत, असा युक्तिवाद शिनोव्हा हिच्या वतीने करण्यात आला. दुसरीकडे किशन आणि सोनी यांच्यात कोणतेही संबंध नव्हते. दोघेही चित्रपटसृष्टीत काम करत असल्याने चांगले मित्र होते मात्र दोघे कधीच नातेसंबंधांत नव्हते, असा प्रतिदावा किशनच्या वतीने करण्यात आला. तसेच शिनोव्हा हिचा डीएनए चाचणीची मागणी करणारा अर्ज फेटाळण्यात आला. 


शेअर करा