‘ चोर आले पन्नास खोके घेऊन ‘ म्हणणारा राज मुंगासे अद्यापही गायब

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आली असून ‘ चोर आले 50 खोके घेऊन ‘ हे रॅप गाणे गाणारा राज मुंगासे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले होते. 50 खोके आणि चोर या शब्दप्रयोगाचा वापर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला होता. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता म्हणून या तरुणाला अटक केल्याचे सांगण्यात आले होते.

राज मुंगासे याचा आतापर्यंत ठावठिकाणा त्याच्या कुटुंबाला मिळालेला नसून पोलिसांनी कुठल्या ठिकाणावरून त्याला ताब्यात घेतलेले आहे याची देखील माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. राज मुंगासे यांच्या भावाने गायब असल्या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावरून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. राज मुंगासे यांच्या भावाची तक्रार पोलीस घेत नाही आणि मुंबई पोलिसांना फोनवरून विचारणा केली असता ते सदर प्रकरण हे संभाजीनगर येथील असल्याचे सांगत आहे मात्र कोणत्या पोलीस स्टेशनचे आहे याबद्दल कुठलीही माहिती दिली जात नाही असा आरोप त्यांच्या भावाने केलेला असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना याप्रकरणी ट्विट करून चिंता व्यक्त केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणतात की , ‘ राज मुंगासे हा रॅपर ज्या दिवसापासून त्याचे गाणे सोशल मीडियावर आले, त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये आली. पण, तो कुठे आहे? कोणत्या पोलीस स्टेशनला आहे? हे मात्र त्याच्या घरच्यांना माहीत नाही. घरच्यांनी मला निरोप पाठवला असून त्यामध्ये त्यांच्या मनातील भिती स्पष्ट दिसत आहे.पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. त्वरीत त्याचे शोधकार्य करावं आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या राज मुंगासेच्या कुटुंबियांना माहिती द्यावी. त्याचे कुटुंबीय दुःखात आहे. ‘


शेअर करा