पुन्हा एकदा मोदी यांचे ‘ व्हिक्टीम कार्ड ‘ सुरु , 91 वेळा माझा अपमान केला पण..

शेअर करा

काँग्रेसबद्दल बोलताना भाजपचे नेते आक्रमक होऊन अत्यंत खालच्या पातळीत काँग्रेस तसेच गांधी कुटुंबीयांवर टीका करतात मात्र आपल्यावर कुणी टीका केली तर ते मात्र भाजप नेत्यांना सहन होत नाही. आपण पीडित असल्याचा आव आणला जातो त्यात चक्क पंतप्रधान मोदी यांचा देखील समावेश आहे. कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा ‘ व्हिक्टीम कार्ड ‘ खेळण्यास सुरुवात केलेली असून काँग्रेसने मला आतापर्यंत 91 वेळा अपमानित केलेले आहे असे म्हटलेले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना विषारी साप असे म्हटलेले होते त्यानंतर सर्वच भाजप नेत्यांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडलेली असून अत्यंत खालच्या पातळीवर भाजपच्या नेत्यांची वक्तव्य समोर येत आहेत. बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथे जाहीर सभेत मोदी म्हणाले की, ‘ काँग्रेसने माझ्याबद्दल वापरलेल्या अपशब्दांची यादी मला कोणीतरी पाठवलेली आहे त्यामध्ये 91 वेळा माझ्याबद्दल अपशब्द वापरलेले आहेत. काँग्रेसने अपशब्दाच्या शब्दकोशावर वेळ घालवण्यापेक्षा सुशासनावर लक्ष केंद्रित केले असते तर त्यांची अशी अवस्था झाली नसती ‘ असेही मोदी पुढे म्हणाले .

मोदी म्हणाले की, ‘ मागील निवडणुकीत काँग्रेसने चौकीदार चोर है असे अभियान चालवलेले होते त्यानंतर मोदी चोर आहे त्यानंतर पुन्हा ओबीसी समुदाय चोर है असे म्हणत माझ्या लिंगायत बंधू-भगिनींना अपमानित केलेले आहे. काँग्रेसच्या या शब्दाला मताच्या माध्यमातून उत्तर उत्तर द्यावे असे देखील त्यांनी आवाहन केलेले आहे. काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो , ‘ असे देखील मोदी पुढे म्हणाले. विशेष म्हणजे काँग्रेसने कधीही ओबीसी समुदायाबद्दल असे काही बोललेले नसताना मोदी हे धादांत खोटे बोलत आहेत.


शेअर करा