भाजपचे ‘ गोडसे प्रेम ‘ पुन्हा जागृत , माजी मुख्यमंत्री याचे वादग्रस्त विधान

शेअर करा

सार्वजनिक कार्यक्रमात गांधींचा उदो उदो करायचा आणि पक्षातील नेत्यांकडून गोडसेची महती गाऊन घ्यायची असे प्रकार भाजप सत्तेत आल्यानंतर सुरू झालेले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘ काँग्रेसचे गांधी तर भाजपचे गोडसे ‘ असे म्हटल्यानंतर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी महात्मा गांधींचा मारेकरी असलेला नथुराम गोडसे याला देशभक्त म्हटलेले आहे . कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील धडा शालेय पुस्तकामधून काढून टाकलेला आहे सोबतच जर पुस्तक तुमच्यापर्यंत आलेले असेल तर हा धडा शिकवू नये असे देखील आदेश शिक्षकांना तात्काळ दिलेले आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आडनाव लावत असल्याबद्दल रावत यांनी संताप व्यक्त केला होता . वास्तविक गांधी आडनावाचा इतिहास या भाजपच्या नेत्यांना माहीतच नाही असे नाही मात्र सातत्याने संभ्रम निर्माण करून भाजपकडून असे प्रकार केले जात आहेत त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे.

त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ‘ गांधीजींची हत्या झाली हा वेगळा मुद्दा आहे पण मी गोडसेबद्दल जेवढे समजून घेतलेले आहे त्यावरून तो देशभक्त होता. काँग्रेसच्या बिघडत चाललेल्या अवस्थेमुळे राहुल गांधी हतबल झालेले आहेत आणि मानसिक तणावातून ते बोलत आहेत पण जनता मानसिक तणावातून वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे विचार स्वीकारणार नाही ‘ असे देखील ते पुढे म्हणाले सोबतच गांधी हत्येचे आम्ही समर्थन करत नाही अशी देखील मखलाशी त्यांनी केलेली आहे.

काँग्रेस नेते वैभव वालिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करा . मोदी यांच्या मनात जर गांधीजींसाठी स्थान असेल तर त्यांनी वेळीच निर्णय घेऊन रावत यांची हकालपट्टी करावी तसे न केल्यास गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्याविषयी प्रवचन देणे मोदी यांनी बंद करावे . जागतिक व्यासपीठावर आपली प्रतिमा उजळवण्यासाठी तुम्ही गांधीजींच्या पुतळ्याला फुले अर्पण करतात आणि देशातील तुमच्या नेत्यांना शिव्या देण्यासाठी उद्युक्त करता हे असे नाटक चालणार नाही ‘, असे देखील त्यांनी खडसावले आहे.


शेअर करा