‘ आमच्या देशात राहायचे असेल तर..’ , नितेश राणे राहुरीत काय म्हणाले ?

शेअर करा

नगर जिल्ह्यात राहुरी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून धर्मांतरण आणि लव्ह जिहाद प्रकरणे समोर येत असल्याने काही हिंदू संघटनांनी या मोर्चाचे आयोजन केलेले होते. राहुरीतील उंबरे इथे तीन अल्पवयीन मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली असून या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते.

नितेश राणे यांनी यावेळी बोलताना , ‘ हिंदू राष्ट्राला सुरक्षित ठेवण्याचे काम आम्ही करत असून हिंदू समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी जे जे काही करावे लागेल ते आम्ही करू त्यासाठी सगळे कायदे आणू. इथे जो राहतो तो वंदे मातरम म्हणतो . अबू आझमी यांना हिंदू धर्मात यायचे असेल तर त्याचे स्वागत करू पण आमच्या देशात राहायचे असेल तर वंदे मातरम म्हणावे लागेल ‘, असे देखील नितेश राणे यावेळी म्हणाले . नितेश राणे यांनी पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल देखील कारवाईचे संकेत दिलेले आहेत.

नितेश राणे म्हणाले की , ‘ प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासनाने कारवाई करावी अशी आमची अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात त्या महिलेला वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. हे राज्य काँग्रेसचे नाही किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाही . प्रशासन जर हे विसरत असेल कुणाचे राज्य आहे तर रोज सकाळी त्यांना गुड मॉर्निंग चे मेसेज पाठवतो ‘ असे देखील ते म्हणाले.


शेअर करा