भररस्त्यात अत्याचाराचा प्रयत्न, पोलिसांसमोर आरोपीचे ‘ विक्टरी साईन ‘

शेअर करा

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असून कल्याण इथे शिकवणी वर्गावरून परत येणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुंडाने भर रस्त्यात अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने यास विरोध केला. कल्याण पूर्व येथील ही घटना असून विशाल गवळी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने तिचा स्कुटीवर पाठलाग केला आणि तिला भेटल्यानंतर एका कोपऱ्यात खेचत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केलेला होता.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला ज्यावेळी पोलिसांनी पकडले आणि तिथे काही पत्रकार पोहोचले होते त्यावेळी त्याने पत्रकारांकडे पाहून विक्टरी साईन दाखवत फोटोची पोज देखील दिली. पीडित विद्यार्थिनीने त्याच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि त्यानंतर कोळशेवाडी पोलीस ठाणे गाठलेले होते. कोळसेवाडी पोलिसांचा वचक कमी होत असल्याच्या तक्रारी नागरिक आता करू लागलेले आहेत.

आरोपी विशाल गवळी याच्या विरोधात याआधी देखील बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याआधी त्याला तडीपार देखील करण्यात आलेले होते. पोलीस सोबत असताना पत्रकारांकडे पाहून चक्क कॅमेऱ्याकडे पाहून विक्टरी साईन दाखवली. त्याचा हा फोटो समोर आल्यानंतर सर्वच थरातून त्याच्या या वर्तणुकीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे .


शेअर करा