हनिमूनसाठी जाताना गायब झालेली ‘ बायको ‘ सापडली , सिमकार्ड बदललं अन ..

शेअर करा

काही दिवसांपूर्वी पतीसोबत हनिमूनसाठी दार्जिलिंगला निघालेली एक महिला किशनगंज रेल्वेस्थानकावरून अचानकपणे गायब झालेली होती. तिच्या नवऱ्याने तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही म्हणून अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलेले होते. संतप्त झालेल्या नवऱ्याने रेल्वे प्रशासनाला देखील यासाठी जबाबदार धरलेले होते मात्र अखेर त्याची बायको सापडलेली असून एका ठिकाणी शॉपिंग करताना तिला ताब्यात घेण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , प्रिन्सकुमार आणि काजल कुमारी असे या नवरा बायकोचे नाव असून बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यातून ते हनिमूनसाठी म्हणून दार्जिलिंगला निघालेले होते. तिथे दार्जिलिंगला जात असताना किशनगंज इथे ही महिला अचानकपणे गायब झालेली होती . सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील ती आढळून आली नाही त्यामुळे तिला शोधण्यात बरीच मेहनत रेल्वे पोलिसांना करावी लागली. हरियाणाच्या गुरुग्राम येथे एका शॉपिंग सेंटरमध्ये खरेदी करत असताना तिला ताब्यात घेण्यात आलेले असून तिच्या पतीने आमच्यात काहीही भांडण झालेले नव्हते असे म्हटले होते . एसी डब्यांमध्ये दोघे प्रवास करत होते त्यावेळी तिने वॉशरूमला जाण्याचा बहाना केला आणि त्यानंतर ती गायब झालेली होती.

पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात केली त्यावेळी काजल हिने गुरुग्राममध्ये तिचा मोबाईल बंद करून टाकलेला होता त्यानंतर काही काळ तिचा मोबाईल बंद होता आणि नंतर तिने अचानक मोबाईल सुरू केला त्यावेळी त्यातील जुने सिम कार्ड काढून फेकून दिले आणि स्वतः जवळचे नवीन सिम कार्ड त्यामध्ये टाकले त्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात ती आली आणि यानंतर ताब्यात घेण्यात आलेले आहे. लग्न झाल्यावर हनिमूनला जाणे त्यांना शक्य झालेले नव्हते म्हणून लग्नानंतर पाच महिन्यांनी ते हनिमूनसाठी जायला निघाले याच दरम्यान ही घटना घडलेली होती.


शेअर करा