आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळला , आत्महत्या की घातपात ?

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या धाराशिव जिल्ह्यात समोर आलेले असून शिक्षण करून अध्यात्मिकतेचे धडे गिरवत असलेल्या एका 14 वर्षीय विद्यार्थ्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेला आहे. त्याच्या शरीरावर व्रण आढळून आलेले असून सदर प्रकरणी एका संस्थाचालकासोबत एकूण चार जणांच्या विरोधात ढोकी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल झालेला आहे.

प्रेम शिंदे असे या चौदा वर्षीय बालकाचे नाव असून तो वानेवाडी येथील श्री संत नारायण बाबा रामजी बाबा आध्यात्मिक संस्था अर्थात आश्रम इथे अध्यात्मिक शिक्षण घेत होता. परिसरातील एका शाळेत तो शिक्षण देखील घेत होता आणि इयत्ता दहावीमध्ये तो शिकत होता. आध्यात्मिक आश्रमात होत असलेल्या महाराजांच्या त्रासाला वैतागून त्याने गळफास घेतल्याचे वृत्त असून त्याच्या वडिलांनी मात्र या प्रकरणी त्याच्या मृत्यूवर संशय व्यक्त केलेला आहे.

पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे..

माझा मुलगा प्रेम हा एक महिन्यांपूर्वी कुणाला काही न सांगता आमच्या राहत्या घरी वाखरवाडी इथे सकाळी सहाच्या सुमाराला आलेला होता त्यावेळी त्याला कुणाला काही न सांगता कसा आलास असे विचारले त्यावेळी त्याने आश्रमात नांदे महाराजांनी शेतीचे काम मला करायला सांगितले मात्र मी ते केले नाही म्हणून मला खूप मारले आहे असे तो म्हणाला सोबतच तेथील काका महाराज उंबरे हे आश्रमाच्या शेतात खूप काम करायला लावतात आणि काम केले नाही तर मारतात म्हणून आपण निघून आलेलो आहे असे त्याने सांगितले होते.

मी पुन्हा त्याला वानवडी येथील आश्रमामध्ये सकाळी नऊच्या सुमारास नेऊन सोडले आणि महाराजांना त्याला कशाबद्दल मारलेले आहे असे विचारले त्यावेळी त्यांनी आश्रमातून तो पळून जायचे म्हणत होता म्हणून त्याला मारहाण केलेली आहे असे सांगितले. मी त्यांना मारहाण करू नका विश्वासात घेऊन शिकवा असे म्हटले आणि त्यानंतर पुन्हा घरी आलो.पाच ऑगस्ट रोजी प्रेम हा रात्री साडेदहा वाजल्यापासून आश्रमातून गायब झालेला आहे अशी माहिती मला मिळाली त्यावेळी मी नांदे महाराज यांना फोन करून प्रेम कुठे आहे या संदर्भात माहिती विचारली त्यावेळी त्यांनी मी ढोकी इथे बघायला गेलेलो आहे. आश्रमातून तो कुठेतरी निघून गेलेला आहे असे सांगितले होते .

दुपारी एकच्या सुमारास मी माझ्या मोटार सायकलवर बसून आश्रमामध्ये गेलो त्यावेळी त्यांना रडत माझा मुलगा कुठे आहे असे विचारले त्यावेळी नांदे महाराज , काका महाराज उंबरे , माऊली महाराज उंबरे आणि पोलीस पाटील यांनी आपल्या मुलाचा चिंचेच्या झाडाला लटकलेला मृतदेह दाखवला. इतर विद्यार्थी आणि इतर परिसरातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर मला समजले की चार ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आश्रमातील मुलगा मनोहर किशनराव इस्के ( तालुका जिल्हा परभणी ) याने माझ्या मुलाने पैसे चोरल्याचे कारण देत त्याला काठीने खूप मारहाण केलेली आहे असे सांगितले होते. त्यांच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून मुलाने त्याचे जीवन संपवले असे माझे म्हणणे आहे .

पोलिसांनी मनोहर किसनराव इस्के , काका महाराज उंबरे , प्रशांत मारुती नांदे , गोपाळ महाराज यांच्या विरोधात ढोकी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 323 324 34 आणि 305 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर गुन्ह्यात इतर कलम वाढवण्यात येतील असे सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा