अखेर ‘ त्या ‘ तलाठी मॅडमला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून लाच घेतल्याप्रकरणी तलाठी म्हणून काम करणाऱ्या एका महिलेला तब्बल चार वर्ष तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम ए बरालिया यांनी या खटल्याचा निकाल जाहीर केलेला असून सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाने यांनी काम पाहिलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार व्यक्ती यांचे वडील अकरा वर्षांपूर्वी मृत्युमुखी पावलेले होते त्यानंतर जमीन वारसपत्रानुसार तक्रारदार व्यक्ती आणि त्यांचे भाऊ यांच्या नावावर संपत्तीची नोंद करण्यात आलेली होती मात्र आठ अ वेगळे झालेले नव्हते म्हणून तक्रारदार यांनी तलाठी महिला यांच्याकडे यासंदर्भात खाते वेगळे करून देण्याची मागणी केलेली होती त्यावेळी त्यांनी दहा हजार रुपयांची मागणी केलेली होती.

तक्रारदार व्यक्ती यांनी त्यांच्याशी तडजोड करत तीन हजार रुपये देण्याचे देखील ठरलेले होते मात्र याच दरम्यान तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ( १०६४ टोल फ्री नंबर ) तक्रार केली आणि तीन हजार रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलेले होते. पाथर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि त्यानंतर प्रकरण न्यायालयात चाललेले होते. सरकारी पक्षातर्फे मंगेश दिवाने यांनी कामकाज पाहिले आणि अखेर तलाठी महिला यांना चार वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.


शेअर करा