अजूनही ‘ तो ‘ निलंबित पोलीस मोकाटच , पोलिसांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह

शेअर करा

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या एका पोलिसाने महिलेची छेड काढण्याचे प्रकरण समोर आलेले होते . सदर प्रकरणी विधान परिषदेत देखील मुद्दा उपस्थित करण्यात आलेला असून छेड काढणाऱ्या या पोलिसाला निलंबित करण्यात आलेले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी ही कारवाई तात्काळ केलेली असली तरी अद्यापदेखील या पोलिसाला अटक करण्यात आलेली नाही.

उपलब्ध माहितीनुसार , संजय गुंड असे या निलंबित पोलिसाचे नाव असून बीडमधील एका गावात कामगार महिलेला पाणी देण्याचा बहाना करून जवळ बोलावत तिला पाचशे रुपयांची नोट देऊन तिचा हात पकडल्याचा आरोप त्याच्यावर आहे. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी देखील या पोलिसाला चांगलाच चोप दिला आणि त्याचा व्हिडिओ देखील समाजमाध्यमात व्हायरल झालेला होता.

दुसऱ्याच दिवशी पीडित महिला आणि त्यांचे नातेवाईक यांनी धारूर पोलीस ठाणे गाठत आरोपींवर कारवाईची मागणी केली मात्र पोलिसांकडून छेडछाडीच्या प्रकारावर देखील मिटवून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले होते. गुन्हा दाखल करण्यास देखील पोलिसांनी टाळाटाळ केली सोबतच नातेवाईकांवर देखील सौम्य लाठीच्या पोलिसांनी केला त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत हे प्रकरण गेल्यावर आरोपीवर गुन्हा दाखल झाला मात्र आरोपी अद्यापदेखील मोकाट आहे. निलंबित पोलिसाला देखील अटक करण्यात पोलिसांना कुठली अडचण येत आहे असा संतप्त सवाल महिलेच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेला आहे.


शेअर करा