आपण सत्तेचा पुरेपूर वापर विकास कामांसाठीच केला , प्राजक्तदादा म्हणाले की..

शेअर करा

राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी येथे बोलताना राज्यात महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षे सत्तेत असताना आपण सत्तेचा पुरेपूर वापर विकास कामांसाठी केलेला आहे आणि त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवता आला याचे आत्मिक समाधान आपल्याला असून पुढील काळात देखील विविध विकास कामांना आपले प्राधान्य असेल. आपण सध्या राज्यातील सत्तेत नसलो तरी आमदार म्हणून जितके काम करता येईल तितके करू , असे त्यांनी म्हटलेले आहे .

राहुरी तालुक्यातील कोट्यावधी रुपयांच्या खर्चाची विकास कामे मार्गी लागल्याने नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने आमदार प्राजक्त तनपुरे यांचा नागरिकांकडून सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. प्राजक्त तनपुरे म्हणाले की , ‘ महाविकास आघाडीच्या काळात माझ्याकडे सहा खात्यांची जबाबदारी होती. त्या सर्व खात्यांमार्फत मतदार संघासह राज्यात काम करण्याची संधी मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली होती. त्या संधीचे सोने करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केले. आदिवासी मंत्री असताना अनेक आदिवासी कुटुंबांना जातीचे प्रमाणपत्र तसेच शबरी योजनेतून घरकुल आणि विविध योजनांचा देखील लाभ मिळवून दिला.

ऊर्जा खात्याच्या मार्फत मोठा निर्णय घेऊन वांबोरी सबस्टेशनमध्ये कात्रडसाठी स्वतंत्र लिंक लाईन उभी केली त्यामुळे कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याच्या तक्रारी कायमच्या दूर झाल्या. रस्ते कामाला देखील आपण प्राधान्य दिले मात्र त्यानंतर सरकार बदलल्याने विविध कामांना स्थगिती मिळाली . या कामात आपण यावेळी आपण पदरमोड करून न्यायालयात दाद मागत न्याय मिळवून घेत न्याय मिळवून घेतला. विविध विकासकामे मार्गी लावल्याचे आपल्याला समाधान मिळालेले आहे , असे देखील त्यांनी म्हटले आहे .


शेअर करा