सीमा हैदरच्या ‘ त्या ‘ फोटोने पुन्हा सोशल मीडियात धुमाकूळ

शेअर करा

पाकिस्तानमधून प्रियकराच्या शोधात आलेली सीमा हैदर सोशल मीडियामध्ये चांगलीच चर्चेत असून त्यांच्या प्रेमप्रकरणावर सध्या कराची टू नोएडा या चित्रपटाची शूटिंग देखील सुरू आहे. सीमा आणि तिचा पती सचिन दोघेही अत्यंत मीडिया फ्रेंडली असल्याकारणाने माध्यमेदेखील त्यांच्या बातम्या रोज प्रकाशित करत आहेत. सद्य परिस्थितीत सीमा हैदर हिच्याबद्दल एक आणखीन माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियात वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे.

सीमा हैदर हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलेला असून सीमा ही तिच्या एका लहान बाळासोबत बेडवरती आहे त्यामुळे सचिन हा बाप झाला आणि सीमा हैदर ही आई झाली अशाच बातम्या सध्या चर्चेत आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सीमा हैदर हिला दिवस गेले असल्याची देखील चर्चा होती मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसात पुन्हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सचिन बाप झाल्याची चर्चा सुरू आहे.

सीमा हैदर हिला पहिल्या पतीपासून चार मुले असून त्यानंतर ती सचिनच्या प्रेमात पडली आणि भारतात आली. भारतात आल्यानंतर आता पुन्हा आपल्याला पाकिस्तानला जायचे नाही असे तिने स्पष्टपणे सांगितलेले असून सद्य परिस्थितीत ती न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहे. एकीकडे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच एका नवजात मुलासोबत तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून पोस्टमध्ये तिने ‘ मी सचिनच्या मुलाला जन्म दिला आहे मी खूप आनंदी आहे ‘ असे देखील म्हटल्याची चर्चा आहे मात्र अधिकृतरित्या त्याची पुष्टी करण्यात आलेली नसून मीडिया रिपोर्टच्यानुसार हा प्रकार हा सर्व प्रकार फोटोमार्फ करून करण्यात आलेला आहे. सीमा हैदर हिने आपण प्रेग्नेंट असल्याचे वृत्त नाकारलेले होते सोबतच हा खाजगी विषय आहे असेही ती म्हणाली होती.


शेअर करा