आठ माजी भारतीय नौदल सैनिकांना परदेशात मृत्युदंडाची शिक्षा , गोदी मीडिया गप्प

शेअर करा

सैन्यदलात कार्यरत असलेल्या व्यक्तीप्रती संपूर्ण देशात आदराची भावना असते मात्र भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या तब्बल आठ माजी सैनिकांना कतार देशांमध्ये चक्क मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सदर प्रकरणानंतर देशभरात खळबळ उडाली असून इस्रायलसाठी हेरगिरी प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलेले आहे. गोदी मीडियात मात्र याबाबत सन्नाटा दिसून येत आहे .

कतारकडून या संदर्भात वृत्त आल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केलेली असून आम्ही सातत्याने कतारच्या संपर्कात आहोत असे म्हटलेले आहे. सदर निर्णयाच्या विरोधात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध पत्रक जाहीर करत माहिती दिलेली आहे.

भारतीय मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , फाशीच्या निर्णयाच्या शिक्षेने आम्ही आश्चर्यचकित झालेलो आहोत मात्र कोर्टाच्या विस्तृत निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत. ज्यांना शिक्षा सुनावली त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या तसेच कायदेतज्ञांच्या आम्ही संपर्कात आहोत ,’ असे म्हटलेले आहे. कतारच्या अधिकाऱ्यांसमोर आम्ही यासंदर्भात प्रश्न उपस्थित करू असे देखील परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा