नगर जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ , एटीएम स्क्रीनवर मेसेज आला की..

शेअर करा

नगर जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून कर्जत इथे चक्क एटीएम फोडण्याचा प्रकार समोर आलेला आहे. बँकेच्या कॅशियरने या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली असून तपास सुरू असल्याची माहिती आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सचिन पांडुरंग कांबळे ( वय 38 वर्ष नोकरी कॅशियर राहणार कर्जत ) यांनी याप्रकरणी राशीन पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिलेली असून दिनांक 24 ऑक्टोबर रोजी रात्री एक दरम्यान कर्जत येथील घरी ते असताना असताना एका व्यक्तीने त्यांना भांबोरा गावातील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएममध्ये चोरी झालेली आहे तुम्ही लगेच या , अशी माहिती दिलेली होती..

तक्रारदार व्यक्ती शिपाई सौरभ रामचंद्र सुद्रिक यांना घेऊन तिथे गेले त्यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएमचे मशीन गॅस कटरने कापलेले होते. शाखेचे मॅनेजर यांनी तिथे 17 तारखेला पाच लाख रुपये भरलेले होते. मशीनमधून रिपोर्ट काढला त्यावेळी त्यामध्ये अवघे 28 हजार 300 रुपये शिल्लक असल्याचे स्क्रीनवर दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यावेळी दोन व्यक्ती यांनी गॅस कटरच्या माध्यमातून चोरी केल्याचे लक्षात आले त्यानंतर पांढऱ्या रंगाची क्रेटा गाडी त्यात ड्रायव्हर आणि इतर एक असे दोन व्यक्ती बाहेर दिसून आलेले आहेत आणि दोन चोरटे असा एकूण चार जणांनी हा प्रकार केल्याचा समोर आलेले आहे. सदर प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू असल्याची माहिती आहे.


शेअर करा