‘ डीएनए ‘ अहवालाने झाली खात्री , आरोपीस अखेर 25 वर्षांची सक्तमजुरी

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात समोर आलेले असून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी तब्बल 25 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सतीश शिवाजी चव्हाण ( वय 32 वर्ष राहणार उमरगा जिल्हा उस्मानाबाद ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून फिर्यादी हे पीडित मुलीचे वडील आहेत. ते ऊस तोडीचे काम करत असताना वळसंग इथे कुटुंबासोबत आले त्यावेळी आरोपी हा तिथे ट्रॅक्टर चालकाचे काम करत होता. फिर्यादी यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर आरोपीने तिला घेऊन पलायन केलेले होते.

आरोपी हा स्वतः विवाहित होता तरीदेखील त्याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले आणि पळवून नेले . तिचा शोध घेतल्यानंतर ती आरोपी सोबतच आढळून आलेली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी ती सात महिन्यांची गरोदर होती. आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले त्यातून तिला दिवस गेले. डीएनए अहवालामधून देखील पीडित मुलीच्या पोटातील बाळ हे आरोपीचेच असल्याचे समोर आलेले होते.

आरोपीने अत्याचार करतेवेळी त्याला सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित होते. डीएनए अहवाल आणि साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालयाच्या निदर्शनास सरकारी वकील यांनी एडवोकेट प्रकाश जन्नु यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. सरकारी पक्षतर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले आणि त्यानंतर आरोपीला पंचवीस वर्षे सक्त मजुरी तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे.


शेअर करा