देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची प्रचाराची गाडी अद्यापही ‘ आपण काय केले यापेक्षा इतरांना दूषणे देण्यातच ‘ व्यस्त असल्याची दिसून येत आहे . छत्तीसगड इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतिहास आणि भविष्य याच्यातच रमत असल्याचे त्यांच्या भाषणात दिसून आले. वर्तमानातल्या देशातील बेरोजगारी , महागाई अशा परिस्थितीवर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्धतशीरपणे मौन बाळगलेले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की , ‘ छत्तीसगडची निर्मिती भाजपने केलेली आहे त्यामुळे भाजपच छत्तीसगडचा विकास करेल . भ्रष्टाचारातून तिजोरी भरण्याला काँग्रेसचे प्राधान्य आहे . काँग्रेसचे सरकार तुम्हाला लुटण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांनी महादेव नाव देखील सोडलं नाही. दोन दिवसांपूर्वी रायपुरमध्ये पैशाचा मोठा साठा आढळून आलेला होता हे पैसे जुगार आणि सट्टेबाजांचे असल्याचे देखील लोक म्हणतात , ‘ असेही मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की , ‘ सट्टेबाजांच्या पैशातून काँग्रेसचे नेते आपले घर भरत आहेत. दुबईत बसलेल्या लोकांशी त्यांचा काय संबंध आहे याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी छत्तीसगडच्या जनतेला द्यावे. काँग्रेसवाले मोदींना रात्रंदिवस शिव्या घालतात आता छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय यंत्रणांना देखील शिव्या देण्यास सुरुवात केलेली आहे मात्र मोदी शिव्यांना घाबरत नाही . भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यासाठी जनतेने मला पाठवलेले आहे ‘, असे देखील ते पुढे म्हणाले.
मोदी यांनी पुढे बोलताना छत्तीसगड लुटणाऱ्यांवर कारवाई केली जाईल त्यांच्याकडून प्रत्येक पैशाचा हिशोब घेतला जाईल . छत्तीसगडच्या भ्रष्ट सरकारने एकामागून एक घोटाळे केलेले आहेत. भाजप सत्तेत आल्यानंतर सर्व घोटाळेबाजांची चौकशी करून त्यांना तुरुंगात पाठवेल , असे देखील मोदी पुढे म्हणाले.