वनविभागाच्या जागेत हॉटेल ?, साहेबांना संधी दिसली पण आली अंगलट

शेअर करा

महाराष्ट्रात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार नाशिक इथे समोर आलेला आहे . हॉटेल व्यवसायिकाला धमकी देत खंडणी उकळणाऱ्या वनविभागाच्या एका अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक केलेली आहे. सातपूर पोलीस ठाण्यात त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , शैलेंद्र आनंद झुटे ( वय 48 ) आणि साहेबराव बाजीराव महाजन ( वय 54 ) अशी संशयित व्यक्तींची नावे असून झुटे वन परिमंडळ अधिकारी म्हणून तर महाजन हा वनरक्षक पदावर कार्यरत आहे. दोघेही सातपूर वनविभाग कार्यालयात नेमणुकीला असून वर्ग तीनचे अधिकारी आहेत.

तक्रारदार व्यक्ती यांचे वय 48 वर्षे असून तक्रारदार यांचे हयात दरबार नावाने एक हॉटेल आहे. वनविभागाच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून हॉटेलचे बांधकाम केलेले आहे म्हणून तक्रारदार यांनी संशयित व्यक्ती यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना मागील दहा वर्षापासून अतिक्रमण करून तुमचा हा व्यवसाय सुरू आहे असाच व्यवसाय पुढे सुरू ठेवायचा असेल तर एक लाख रुपयांची लाच द्या असे म्हटलेले होते.

तक्रारदार व्यक्ती यांनी आपल्याकडे इतके पैसे नाहीत म्हणून संशयित आरोपींनी 60000 रुपयावर व्यवहार केला मात्र तरीदेखील आपल्याकडे इतकेही पैसे नाहीत म्हटल्यावर तीस हजार रुपयांवर त्यांचा व्यवहार ठरलेला होता . तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर , अप्पर अधीक्षक माधव रेड्डी आणि उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत आरोपींना 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेले आहे.


शेअर करा